जीवनात सोपं असं काही नसते. काही मिळवायचे असेल तर त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते.
MPSC राज्यसेवा परीक्षा सुद्धा म्हणावी तशी सोपी नाहीये. तर मग ह्या परीक्षेत सफल व्हायला काय करावं लागणार आहे?
सर्वात प्रथम तुमच धेय्य निश्चित करा, ते पूर्ण करण्यासाठी लागणारी मेहनत कोणत्या स्वरुपाची असायला पाहिजे हे मी सांगेन, ठीक आहे तर मग?
- सर्वात आधी हे नक्की करा की तुम्ही जो अभ्यास करत आहे तेच तुम्हाला व्हायचं आहे का?
- स्वप्न पाहण खूप सोपं आहे पण ते सिद्ध/पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत व हिम्मत लागते आणि हे खूप कठीण काम आहे. दुसरे म्हणतात म्हणून MPSC च स्वप्न पाहण चुकीच आहे, तुमचं स्वतःचा तो निर्णय असावा लागतो.कारण त्यासाठी लागणारी मेहनत तुम्हालाच करावी लागणार असते. तुम्ही स्वतःच निर्णय घ्या, तुमची लायकी काय आहे हे तुमच्याशिवाय कोण जाणू शकतं?
- तुम्ही स्वत बघा की अश्या परीक्षेसाठी लागणारी मेहनत तुमच्या अंगी आहे का? तुमच्याजवळ तो सेल्फ-कोन्फिडेंस म्हणजेच आत्मविश्वास आहे का? सतत लागणारी दृढ इच्छाशक्ती आहे का?
- जर वरीलपैकी काही नसेल तर मग असा व्यक्ती असफल्तेन व्याकूळ होतो आणि मग निराशेच्या अंधारात बुडून जातो.
- पण जर तुमचा निर्णय तुमच्या मेहनती, आत्मविश्वासानं, दृढ इच्छाशक्तीन घेतलेला आहे अत्र मग निश्चिंत पुढे जा.
- सुयोग्य स्टडी मटेरियल निवडा आणि अभ्यासाला लागा. तुमची एनर्जी इकडे तिकडे वाया ना घालवता अभ्यासात घाला.
राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास व्यापक/विस्तीर्ण (Wide Extensive ) व मोजकाच (Selective Intensive) असावा. पूर्व परीक्षेसाठी विस्तीर्ण स्वरूपाचा करावा व मुख्य परीक्षेसाठी सिलेक्तीव स्वरूपाचा करावा.
Continue….
पार्ट-II – upadted on 7th Oct 2016
- राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांचा अभ्यास तर पूर्ण करावाच परंतु त्याव्यतिरिक्त चालू घडामोडींवर जास्त लक्ष केंद्रित करा. चालू घडामोडी कधीपासून बघाव्यात? पूर्व परीक्षेच्या एक वर्ष आधीपासून ! उदाहरणार्थ, २०१७ ची परीक्षा फेब्रुवारी किंवा एप्रिल मध्ये असू शकेल म्हणून मग १ जानेवारी २०१६ पासूनच्या सर्व घडामोडी वाचून समजून घ्या आणि त्यावर नोट्स तयार करा.
- परीक्षेत चालू घडामोडींवर कसे प्रश्न येतात ते २०१६ ची ही प्रश्नपत्रिका बघितल्यावर समजेल: Click HERE
- चालू घडामोडींसाठी कशी तयारी केली पाहिजे त्यासाठी ही लिंक वाचा: चालू घडामोडी – काय वाचायला पाहिजे?
- राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांचा अभ्यास तर पूर्ण करण्यासाठी कमीतकमी एक वर्ष (पूर्व परीक्षेच्या आधी) लागेल हे लक्षात ठेवूनच आपलं धेय्य ठरवायचं. त्यानुसारच आपलं प्लानिंग करावं.
- येणारी राज्यसेवा परीक्षा द्यायची असेल तर मग आजपासूनच एक क्षणाचाही विलंब न लावता सुरुवात करा.
- दररोज कमीत कमी 10-12 तास अभ्यासाला द्या. मागील सात महिन्यांत काय घडले आहे त्याबद्दल सर्व माहिती शोधून काढा. कोणत्या मुद्द्यांवर प्रश्न येवू शकतात ह्याची लिस्ट बनवा. त्यावर माहिती गोळा करा. नोट्स बनवा.
- पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम बघून ६वी ते १२वी ची पुस्तके वाचून काढा. NCERTच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद निघाले असून ते सुद्धा वाचून काढा.
- त्यानंतर प्रत्येक विषयावर advanced पुस्तके वाचून त्यांचे सुद्धा नोट्स काढा.
- हे सर्व करत असतांना, रिविजन करत रहा आणि मग सराव परीक्षा द्या (घरी बसून प्रश्न पत्रिका सोडवून पहा) आणि तेही वेळेच्या बंधनात राहूनच (ह्यालाच सराव परीक्षा म्हणता येईल ना !).
तुमचा मित्र व मार्गदर्शक,
Anil Dabhade
Director
AD’s IAS Academy
——————————————————————-
Web: http://www.anilmd.com
Blog: https://anilmd.wordpress.com
Call: 9987401168, 8698277829
It’s better
Sir PGP kas join karaych?
प्रियंका, ही लिंक ओपन करा : https://anildabhade.com/courses/rajyaseva/12-months-mpsc-rajyaseva/
त्यानंतर फी पेमेंटसाठी UPI आय डी (adsiasacademy@allbank) वापरा. फी भरल्यानंतर मला कॉल करा व ईमेल सुद्धा करा.
Sir mi PGP kas join karu sangal ka plzzz
Sir mi PGP kas join karu
@प्रियंका, ही लिंक ओपन करा : https://anildabhade.com/courses/rajyaseva/12-months-mpsc-rajyaseva/
त्यानंतर फी पेमेंटसाठी UPI आय डी (adsiasacademy@allbank) वापरा. फी भरल्यानंतर मला कॉल करा व ईमेल सुद्धा करा.
Respected sir, maz 12 वी विज्ञान या शाखेतून झालेलं आहे. आणि मी सध्या आरोग्य विभागात कार्यरत आहे पण मला तहसिलदार बनण्याची खूप इच्छा आहे, पण 8 तास ड्युटी आणि नंतर घरची कामं हे सगळं करुन मी होऊ शकते का?आणि याचा कश्या स्वरुपात करावा प्लिज मार्गदर्शन करावे…आणि सर किति मार्कसना पासिंग आहे?आपले मार्गदर्शन व्हावे…..
@प्रियंका, तहसीलदार होण्यासाठी तुम्हाला एमपीएससी राज्यसेवा ही परीक्षा द्यावी लागेल आणि त्यासाठी डिग्री आवश्यक आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मधून बी.ए.ला प्रवेश घ्यावा आणि त्यासोबतच राज्यसेवा परीक्षेची तयारी करावी. हो, नौकरी व घरकाम करूनही तुमचं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता. मुली काहीही साध्य करू शकतात हे तुम्हालाही माहीत आहे. पुढील तीन वर्षात अभ्यास कसा करावा ह्यासाठी ही लिंक बघा: https://anildabhade.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/
Thanks sir.
Sir mi BA chya last year la shikat aahe mala mpsc paper dene aahe tyasathi mala kay karav lagnar aahe.
@अश्विनी, आधी एमपीएससीच्या परीक्षांचा अभ्यासक्रम बघून पुस्तके घ्या आणि अभ्यासाला लागा, सखोल अभ्यास करत करत स्वतःच्या नोट्स काढा, सरावसाठी जुन्या प्रश्नपत्रिका सोडून बघा. आणि जेव्हा परीक्षेची जाहिरात येईल तेव्हा एमपीएससीच्या वेबसाईटवर स्वतःचा प्रोफाइल तयार करून अर्ज सादर करा.
Suggested for me..
sir mi mechanical engineer last year la ahe mala mpsc til kontya kontya post sathi exam deta yeil
@मयूर, जवळपास सर्वच परीक्षा देता येतील. त्यासाठी वर मेन्यू आहे, तो एक्सप्लोर करावा, जसे: https://anildabhade.com/mpsc-rajyaseva/important-information/class-i-ii-posts-services-in-maharashtra/
माज वय ३२ आहे आनी मी आता fy b.com ला admission घेतल आहे तर मी mpsc केल तर चालेल का please help me
@प्रशांत, हो, चालेल. राज्यसेवा, एसटीआय, सहाय्यक कक्ष अधिकारी आणि इतर परीक्षांसाठी (पीएसआय सोडून) ओपनसाठी 38 वर्षे आणि राखीव गटांसाठी 43 वर्षे वयोमर्यादा आहे. ह्या लिंकवर दिल्याप्रमाणे अभ्यास करा: https://anildabhade.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/
मी bsc चे पहिल्या वर्षाला आहे मी mpsc ची तयारी केव्हा पासून करू व कसा करू. And thank you sirbefore qustions anwser.
@अनिल, ह्या लिंकवर दिल्याप्रमाणे एमपीएससी परीक्षेसाठी अभ्यास करावा: https://anildabhade.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/
Mi english madhye mpsc cha peper deu echchhite ter mag abhyas dekhil english madhye karava lagel ka .ho ter mag sarv books mala english madhye avilable astil ka
@अनिल, प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी भाषेत असतात. सर्वच स्टडी मटेरियल इंग्रजीमध्ये उपलब्ध नाहीत तर तुम्हाला काही पुस्तके मराठीत सुद्धा वाचावे लागतील.
Sar me aata bca chya last year ahe tr mala bca nanter mpsc dychi ahe tr sar books ani study kasa suru karava tya sathi heli havi
@शुभम, हे पुस्तक वाचा: https://www.amazon.in/dp/B0838MXPDN/ref=cm_sw_r_wa_apa_i_d.rcEbC1NFFBR
Sir maz graduation complete karun 2year zale ahet mi jr atta preparation start kel tr 2 year madhe 1 post achieve karu shaken ka .but study at home karava lagnar ahe.
@प्राजक्ता, हो, नक्कीच. ह्या ब्लॉगवर ह्याबाबत सर्व मार्गदर्शन उपलब्ध आहे, एक्सप्लोर करा आणि वाचा.
Sir mi aadhi d pharmacy Kel but mala aadhi pasun mpsc dyaychi hoti sir please mala pmsc study kasa karu please mala guide kara
@आंचल, ह्या पेजखाली “view full site” लिंक आहे, त्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती दिसेल, ती वाचा. तसेच वर नेव्हिगेशन मेन्यू आहेत, त्यांना एक्सप्लोर करा, तिथेही सर्व परीक्षांची माहिती दिली आहे. गरज वाटली तर माझं हे मॅन्युअल वाचा: https://www.amazon.in/dp/B0838MXPDN/ref=cm_sw_r_wa_apa_i_d.rcEbC1NFFBR
Ok sir thank you
Sir mi aata 12science passed out kele. Mala pudhe BA gheun mpsc dyaychi aahe , sir mag mi barobar decision ghetal aahe ka?
@भाग्यश्री, हो, अगदी बरोबर.
hello sir , ncert che marathi book sathi link milel ka?
रिता, NCERT ची ओरिजिनल पुस्तके इंग्रजीत व हिंदीत आहेत. मराठी भाषेत ही पुस्तके काही प्रकाशनांनी काढली असल्याने ती विकतच घ्यावी लागतात म्हणून बुक शॉप मधून किंवा अमेझॉन वरून मागवावी.
Hi sir mpsc sathi 10th 12th pass chi value aahe ka aani certificate konte lagtat aani 10th 12th che pn certificates lagtat ka tithe
@आशा, दहावीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. एमपीएससी परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला डिग्री (बीए, बीकॉम, बीएस्सी पैकी किँवा त्या समकक्ष डिग्री) लागेल. दहावी, बारावीच्या बेसिसवर ही परीक्षा देता येत नाही.
12th chi exam ny dili direct Nashik university mdhun online purv pariksha pass keli ani f.y.b.a pn pass zali Ata s.y.la aahe
@आशा, हो, चालेल. 2022ची परीक्षा देऊ शकता.
sir mala mpsc chi pariksha deychi aahe pn mi 10vi1 subject fail aahe tr mi mpsc chi pariksha deu shakto ka