मित्रांनो,
आता आजचा आणि उद्याचाच दिवस बाकी आहे राज्यासेवेच्या पूर्व परीक्षेला तर तुमच्या मनात बहुतेक हा प्रश्न गोंधळ घालत असेल कि GS II (CSAT) मधील कोणते प्रश्न अगोदर आणि कोणते नंतर सोडवायचेत, बरोबर?
ह्या पेपरसाठी 2 तास (120 मिनिटे) आणि 80 प्रश्न सोडवायचे असतात. प्रश्न क्रमांक 74 ते 80 ह्या 7 प्रश्नांचे उत्तर जरी चुकले तरी त्यांचे गुण कमी केल्या जात नाहीत.
ज्यांना गणित व बुद्धिमापन विषयात काहीच अडचण नाही त्यांनी ह्या दोन विषयांशी संबंधित प्रश्न अगोदर सोडवावेत कारण त्यांचा वेळ वाचेल. इतरांनी खालील क्रमाणे प्रश्न सोडवलीत तर चांगले गुण मिळू शकतात. माझा हा एक सल्ला आहे, ज्यांना जसे प्रश्न सोडवायचे असतील त्यांनी त्यांच्या पद्धतीने सोडवावीत.
- डिसिजन मेकिंग चे प्रश्न सर्वात आधी सोडवावेत कारण त्यांना निगेटिव्ह मार्किंग लागू नाही.
- आकलन (उताऱ्यावरील प्रश्न) – प्रथम उतारा किती मोठा आहे हे त्यावरील प्रश्न पाहून कळेल.
- जर 3 प्रश्न असतील तर त्याला 5 मिनिटे द्यावेत.
- जर 4 – 5 प्रश्न असतील तर त्याला 7 मिनिटे द्यावेत.
- जर 6 प्रश्न असतील तर त्याला 8 मिनिटे द्यावेत.
एक उतारा घेवून त्यावरील प्रश्न अगोदर पाहून घ्यावेत आणि मग उतारा वाचावा म्हणजे लगेच उत्तरांना अंडरलाईन करता येईल आणि तसे करावे सुद्धा. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर काय असू शकते करत करत संपूर्ण उतारा वाचून झाला कि मग प्रश्नांची उत्तरे मार्क करावीत.
असे करता करता सर्व उतारे सोडवावेत म्हणजे जास्तीत जास्त गुण मिळण्याची शक्यता निर्माण होईल.
- एखादा प्रश्न अगदी सोपा वाटत असेल तर सावधान !!! तुमचे उत्तर परत एकदा तपासून बघा आणि मगच उत्तर पत्रिकेत मार्क करा.
- प्रश्न कितीही कठीण वाटत असला तरी पहिल्यांदा त्याला सोडू नका. सोडवण्याचा प्रयत्न करा पण जर 40सेकंदात सोडवता नाही आला तर सोडून द्या. नंतर वेळ मिळाला तर सोडवा अन्यथा तसाच राहू द्या.
- सर्व सोपे वाटणारे प्रश्न अगोदर सोडवा.
खालील प्रमाणे वेळेचे नियोजन ठरवा:
- ८० प्रश्नांना १२० मिनिटे असतात. सुरुवातीचे ५ मिनिटे – पेपर चेक करा. १५ मिनिटे शेवटी रिविजन साठी ठेवा.
- १०० मिनिटात ८० प्रश्न सोडवायचेत तर प्रत्येक प्रश्नाला १ मिनिट १५ सेकंद मिळतील परंतु एक प्रश्न ५० सेकंदात सोडवण्याचा प्रयत्न करा. दुसरा राउंड कराल तेव्हा प्रत्येक प्रश्न २५ सेकंदात सोडवायचा प्रयत्न करा.
- जर खूप कठीण प्रश्न असेल तर सोडून द्या व पुढे जा.
- उत्तर बद्दल शंका असेल तर २ चुकीचे उत्तर एलीमिनेत करा आणि मग उरलेल्या २ उत्तरातून योग्य (योग्य) उत्तर निवडा. दोन्हीही बरोबर वाटतील परंतु अचूक उत्तर एकच असेल ते निवडा.
- घड्याळीकडे लक्ष ठेवत चला. ठीक ४:४५ वाजता रिविजनला सुरुवात करा. राहून गेलेले प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा.
- अशा वेळेस टेन्शन येते पण थंड मोठे श्वास घ्या आणि लक्ष केंद्रित करून प्रश्न सोडवा.
- मध्ये मध्ये हात व पाय स्ट्रेच करा व सोडा. डीप-ब्रेथ घ्या व सोडा.
- निगेटिव्ह विचार मनात येऊ देवू नका. फक्त पोझीतीव्ह विचार करा आणि प्रश्न सोडवा.
चला मित्रांनो, गुड लक !!!
Thanks sir…
Sir are there any reservation for PH candidates. if yes then can you please give me detail information for PH candidates considerations.
thank you sir.
@Nilesh, yes, it depends on the availability of the vacancies at the time of the notification of the particular exam.
Sir… it worked fantabulous. I solved almost 73 questions. And I am very much positive towards the result.
By what time can we expect the answer key?
@Shrikant, congrats in advance. Yes, answer key would likely be available by 5th Feb 2014.
thx sir for Success Manra #10. Is there such type qution wich only include for making time-pass or for puzzal in qution paper ?
@राष्ट्रपाल, तुझा प्रश्न मला समजला नाही.
Thanks for this valuble and stress reducing suggestions
khupach chhan ….thank u sir
Thanks sir
Thank sir 4 d valuable suggestion…
Very nice.Thank u sir!
Thanks..sir,u r advice is very very valuable for all aspirants..like me