मित्रांनो,
यु.पी.एस.सी. नागरी सेवा परीक्षेची जाहिरात (२०१३) येत्या एक आठवड्यात येणार असून त्यात अपेक्षित असलेले महत्वाचे बदल खालीलप्रमाणे असू शकतात:
- मुख्य परीक्षेत असणारे वैकल्पिक विषय जसेच्या तसे राहतील परंतु प्रत्येकी २ पेपर ऐवजी १-१ पेपर राहतील व त्यांचे गुण सुद्धा दोन्ही मिळून ६०० असतील म्हणजे प्रत्येक पेपर ला ३०० गुण.
- मुख्य परीक्षेत असणारे सामान्य अध्यानाचे पेपर्स वाढून त्यांची संख्या ४ होईल व प्रत्येकी गुण असतील ३००. चारही पेपर्स चे गुण असतील १२००.
- मुख्य परीक्षेत असणारे बाकी पेपर्स जसेच्या तसेच असतील – इंग्रजी, भाषा पेपर व निबंध
- मुख्य परीक्षा मात्र लेखी परीक्षाच राहील, MCQ म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी होणार नाही.
ह्याबद्दल सर्व माहिती यु.पी.एस.सी. ह्या आठवड्यात नक्कीच जाहीर करेल असे वाटते.
गोंधळून जावू नका, त्यांच्या जाहिरातीची किंवा अधिसूचनेची वाट बघा.
सर्वांना गुड लक !!!