प्रिय मित्रांनो
तुमच्यापैकी बऱ्याच जणांना त्यांच्या क्वेरीच्या उत्तरासाठी बरेच दिवस वाट पहावी लागली म्हणून मी तुमचा क्षमस्वी आहे. मी विदर्भात सेमिनार्स घेत फिरत होतो त्यामुळे मला वेळच मिळाला नाही. मीच माझा ड्रायव्हर असल्यामुळे शेकडो किलोमीटर्स ड्रायव्हिंग करावी लागायची आणि मग सेमिनार घ्यायचा असा प्रोग्राम चालू होता. मी बऱ्याच कॉलेजेस मध्ये गेलो, मला प्रचंड प्रतिसाद मिळाला त्या कॉलेजेस ची नावे खालीलप्रमाणे आहेत:
- शिवाजी महाविद्यालय, अकोला (प्रोफेसर श्री. संजय पोहरे यांनी उत्कृष्ट सेमिनार अरेंज केला)
- जी.एस.महाविद्यालय, खामगाव (डॉ. धनंजय तळवनकर यांनी उत्कृष्ट सेमिनार अरेंज केला)
- शिवाजी इंजिनियरिंग महाविद्यालय, बाभूळगाव अकोला (प्रोफेसर श्री. सुरेश लालवाणी यांनी पुढील भेटीत सेमिनार अरेंज करू असं आश्वासन दिलं)
- एस.एस.जी.एम. इंजिनियरिंग महाविद्यालय, शेगाव (डॉ. एस.एम. देशमुख यांनी पुढील भेटीत सेमिनार अरेंज करू असं आश्वासन दिलं)
- आर.डी.जी. महाविद्यालय, अकोला (प्रोफेसर बाजपेई madam यांनी पुरेपूर प्रयत्न केला पण दुसऱ्या अकॅडेमीचा सेमिनार दुसऱ्याच दिवशी असल्यामुळे वेळ देवू शकल्या नाही,)
- एच.एन.सिन्हा महाविद्यालय पातुर (प्राचार्य डॉ. वी.एन. जायले, प्रोफेसर विखे आणि डॉ. ममता इंगोले यांनी उत्कृष्ट सेमिनार अरेंज केला).
- श्री. सरस्वती समाजकार्य महाविद्यालय, वाशीम (येथील प्राचार्य व प्रोफेसर वी.बी. गावंडे आणि प्रोफेसरएस.एच. उजाडे Madam यांनी उत्कृष्ट सेमिनार अरेंज केला).
- आर.ए. महाविद्यालय, वाशीम (प्रोफेसर संचेती आणि प्रोफेसर रीसोडकर यांनी पुढील भेटीत सेमिनार अरेंज करू असं आश्वासन दिलं)
- श्रीमती. साळून्काबाई महाविद्यालय, वनोजा (प्राचार्य डॉ. डी.आर. गावंडे आणि प्रोफेसरवृंद यांनी उत्कृष्ट सेमिनार अरेंज केला).
- यशवंतराव चव्हाण महाविद्यालय मंगरूळपीर (प्रोफेसर गणेश खंडारे यांनी उत्कृष्ट सेमिनार अरेंज केला).
- नाईक महाविद्यालय, मंगरूळपीर (प्राचार्य श्री. बनसोड यांनी पुढील भेटीत सेमिनार अरेंज करू असं आश्वासन दिलं)
- ना. ना. मुंदडा महाविद्यालय, मालेगाव (मी इथेच शिकलो. त्या दिवशी कोलेज दुपारच होत आणि मला थांबायला वेळ नव्हता त्यामुळे प्राचार्य श्री. जाधव सर यांनी पुढील भेटीत सेमिनार अरेंज करू असं आश्वासन दिलं)
वरील कोलेजेसमध्ये माझ्या एम.पी.एस.सी. सक्सेस मंत्र च्या अनेक कॉपीज लायब्ररीसाठी ठेवून घेतल्या.
खर पाहाल तर असं वाटते की मी जेथे गेलो तेथे माझ्या मार्गदर्शनाची गरज नक्कीच होती. खूप विद्यार्थ्यांना मी जवळून बघितलं, त्यांना मार्गदर्शन केलं, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिलीत. मला समाधान वाटल.
मी माझ्यापरीने फार प्रयत्न केला की छोट्या शहरातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वेळ देवू आणि दिला पण. मी ह्यासाठी जवळपास १५०० किलोमीटर चा प्रवास एकट्याने केला व स्वखर्चाने, स्वत कार चालविली सेमिनारसाठी बऱ्याच जणांना विनवण्या कराव्या लागल्या. बऱ्याच ठिकाणी मला मानसन्मान सुद्धा मिळाला त्यामुळे मला कोणत्याही कॉलेजने मानधन दिलं नाही ह्याच वाईट वाटल नाही पण दिल असतं तर मी अजून बऱ्याच कोलेजेसपर्यंत पोचू शकलो असतो व अजून शेकडो विद्यार्थ्यांना माझ मार्गदर्शन मिळू शकल असतं.
पुढील कार्यक्रमासाठी माझी एवढीच विनंती आहे की परीक्षार्थींनी, विद्यार्थ्यांनी व कॉलेजेसनी एवढी काळजी घ्यावी की त्यांनी माझ्यासारख्या मार्गदर्शकांना पैशांची थोडीफार मदत करावी (पेट्रोलसाठी) जेणेकरून आम्ही हजारो किलोमीटर्सचा प्रवास करू शकू आणि लहान-मोठ्या खेड्या पाड्यातून, शहरातून फिरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकू.
आता पुढील एम.पी.एस.सी. राज्यसेवा पूर्व परीक्षा फेब्रुवारी २०१२ मध्ये आहे तर मित्रांनो, चला तयारीला लागा, फक्त ४ महिनेच उरलेत. ज्यांना वाटत असेल त्यांनी आमचा “Miracle २०१२” पर्सनल गायडंस प्रोग्राम जॉईन करावा.
एक गोष्ट सांगायचीच राहिली, ती हीच की सेमिनार घेत असतांना माझ्या वडिलांची तब्येत फार खराब होती परंतु मी फिरत राहिलो कारण तुमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना माझी गरज होती….The Show Must Go On!!!
MPSC exam kadhi aste ani ti kashi dyayachi? ya exam vishayi mala purn mahiti pahije plz. .sir.
@Devendra, MPSC Rajyaseva Prelims will be in Feb 2012. Read our manual for complete guidance about it:
MPSC Success Mantra
https://anilmd.wordpress.com/mpsc-rajyaseva-main-exam/mpsc-success-mantra-the-complete-manual/
PSI EXAM FEB MADHE KI JUNE ?
@Tanvir, it will be in Jun 2012.
hi sir
mala mpsc Rajyaseva prelim exam Syllabus badal mahiti havi hoti subject vise
@Pravin, Please read my manual MPSC Success Mantra:
https://anilmd.wordpress.com/mpsc-rajyaseva-main-exam/mpsc-success-mantra-the-complete-manual/
hi sir
mala psi main badal mahiti havi hoti karan psi main Syllabus change jhale aahe ani hey new subject add kale aahe
ya subject sati konte book refer karu.
1) मंबुई पोलीस कायदा (10 गणु )
2) मानवी हक्क व जबाबदा-या (40 गुण)
@Pravin, please wait for few days.
what is the meaning of pgp
@Pallavi, PGP is Personal Guidance Program. Here are details: https://anilmd.wordpress.com/2011/09/08/how-our-pgp-works/
appriciated…keep going sir!
i done my graduation this year. plz tell me. prepartion for the post of psi
@Pallavi, next PSI exam will be in Mar or Jun 2012 so start your preparation immediately. Join our 1 year PGP to successfully find your place among the 2200 vacancies next year.
your efforts heartly appreciated.
Thanks.
I NEED YOUR HELP SIR……..
@Pallavi, please mention your query in detail so that I can provide proper solution.